Mahalunge : कंपनीची गोपनीय माहिती चोरून कंपनीचे चार कोटीचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- कंपनीची गोपनीय माहिती चोरून ती प्रतिस्पर्धी कंपनीने देत कंपनीचे चार कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार एक डिसेंबर 2017 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत वासुली येथील पॅक टाईम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घडला.

Sangavi : प्लास्टिक मुक्त राजीव गांधी भाजी मंडई

याप्रकरणी सागर रोहिदास कानवडे (वय 30 ) यांनी महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.28) फिर्याद दिली असून पिरदान नैन ( वय 50 राहणार मोशी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याच्याकडे सोपवलेल्या कामाची गोपनीय माहिती त्याने परस्पर स्वतःच्या मेलवर घेटली. ती त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीचे प्रतिस्पर्धी असणारे भवानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड फाईन फार्मा पॅक एलएलपी यांना दिली.
कंपनीचे तब्बल चार कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.