Sangavi : प्लास्टिक मुक्त राजीव गांधी भाजी मंडई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ह प्रभागाअंतर्गत वार्ड क्रमांक ३२ येथील राजीव गांधी भाजी मंडई प्लास्टिक मुक्त भाजी मंडई म्हणून घोषित करण्यात आली. भाजी मंडईतून प्लास्टिक पिशवी हद्दपार झाली आहे.

Pimpri : पिंपरीमध्ये सुरु होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टीक मुक्त मंडईचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, स्वच्छ भारत कक्षाच्या समन्वयक सोनम देशमुख, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे उपस्थित होते.

ह प्रभागाअंतर्गत वार्ड क्रं-३२ येथील राजीव गांधी भाजी मंडई प्लास्टिक मुक्त भाजी मंडई म्हणुन घोषित करण्यात आली. जितेंद्र वाघ म्हणाले, प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. आपण सर्वांनी मिळून प्लास्टिक पिशवीला हद्दपार करावे. या उपक्रमांमुळे नागरिकांना बाजारात येतानाच कापडी पिशवी घेऊन यायची सवय लागते. विक्रेत्यांचा प्लास्टिक पिशवीचा होणारा खर्चही यामुळे वाचला जाऊन बचत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.