Chakan Crime : दुर्गादेवी विसर्जनासाठी जमाव जमवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – विनापरवाना दुर्गादेवीची स्थापना करुन दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत खेड तालुक्यातील मोई गावात मारुती मंदिरासमोर घडली.

स्वप्नील गोरख करपे (वय 37, रा. मोई, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन बबन नांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सण-उत्सव सार्वजनिकपणे, गर्दी करून साजरे करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. तरीही आरोपी करपे याने विनापरवाना मोई गावात मारुती मंदिरासमोर दुर्गादेवीची स्थापना केली. तसेच दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी लोकांची गर्दी जमवली. याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.