Talegaon Crime : इलेक्ट्रिक शॉक लागून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बोरिंगचे इलेक्ट्रिक काम करताना शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) घडली.

अनिल मुरलीधर बोभाटे (वय 40, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अनिल यांच्या पत्नी भाग्यश्री अनिल बोभाटे (वय 40) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सादिक भाई (रा. चांदखेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सादिक भाई याने अनिल बोभाटे यांना बोरिंगच्या इलेक्ट्रिक जोडणीचे काम सांगितले. काम करत असताना सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. दरम्यान काम करत असताना अनिल यांना इलेक्ट्रिक शॉक लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औंध सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.