Talegaon : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून

एमपीसी न्यूज – सोबत दारू पित असताना झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका मित्राचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बधलवाडी (Talegaon) येथे घडली. 
अमोल मारुती बधाले (वय 32, रा. बधलवाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष शिवाजी डिंबळे, विशाल दत्तात्रय भोसलकर, आकाश दत्तात्रय बधाले (सर्व रा. बधलवाडी, ता. मावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Chinchwad : गुटखा विक्री प्रकरणी दिघी आणि निगडी मध्ये पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बवाले हे संतोष डिंबळे, विशाल भोसलकर, आकाश बधाले हे बधलवाडी येथे मंगळवारी दुपारी दारू पित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून (Talegaon) वाद झाला. त्या वादातून तिघांनी मिळून अमोल याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी  या प्रकरणात  तिघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.