Mumbai : महायुतीला फक्त पंतप्रधान मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले

एमपीसी न्यूज –  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सामील होणार का अशी चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली होती. तसेच, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांचे बोलणे झाले होते. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर (Mumbai) अखेरीस त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन या विषयावर पूर्णविराम दिला आहे.

Loksabha election 2024 : वारकरी सांप्रदायाचे समाजासाठी मोठे योगदान – खासदार बारणे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नकोय. मला कोणत्याही वाटाघाटीत पडायचे नाहीये. सध्या भारत देशाला एका खंबीर नेतृत्वाची खूप गरज आहे आणि तसे नेतृत्व मला नरेंद्र मोदींमध्ये दिसत आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात सीएए, एनआरसी आदी निर्णय देशहितासाठी घेतलेले आहेत.  त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे. तसेच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी (मुंबई) जोरात कामाला लागा असे निर्देशही दिले आहेत. मी तुम्हा सर्वाना लवकरच भेटायला येऊन लवकरच मला जे मांडायचे आहे ते मांडेल असेही त्यांनी सांगितले.

आपला देश सध्या जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातोय. माझी मोदींकडून एवढीच अपेक्षा आहे की,आजच्या तरुणांना चांगले शिक्षण, तंत्रज्ञान व नोकरीची गरज आहे  म्हणून  देशातील तरुणांकडे पंतप्रधानांनी  लक्ष केंद्रित करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.