Today’s Horoscope10 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 10 April 2024– जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 10.04.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – भरणी.

चंद्र राशी – मेष.
—————————–
मेष- ( शुभ रंग- तांबडा)
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)
असलेला पैसा जपून वापरा दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो की जो टाळता येणार नाही. वडीलधाऱ्यांशी आज काही किरकोळ मतभेद संभवतात.

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नवीन काही उद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा जास्तच असेल.

कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणेच आज योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. घरगुती समस्या वडीलधाऱ्यांच्या मदतीने सहजच सुटतील.

सिंह ( शुभ रंग- पिस्ता)
सहजच काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. घरात वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

कन्या (शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाच्या मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको. नाकासमोर चाला.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमान वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे करू शकाल.

वृश्चिक ( शुभ रंग- मोरपिशी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तब्येत थोडी नरम असेल.

धनु (शुभ रंग- जांभळा)
काही रसिक मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेला प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.

मकर (शुभ रंग- निळा)
कौटुंबिक सदस्यात सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. अहंकार सोडून द्या. व्यर्थ वाद टाळा.

मीन (शुभ रंग- आकाशी )
उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात तुम्ही वाढत्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने स्वीकारून त्या पूर्ण कराल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.