Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात

धार्मिक कार्यक्रम,बैलगाडा स्पर्धा, पालखी मिरवणूक,भारुड आणि लोकनाट्य तमाशाचे पहिल्या दिवशी आयोजन

एमपीसी न्यूज- तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा ‘वार्षिक उत्सव’ विविध (Talegaon Dabhade)धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उत्सवाचा पहिला दिवस (मंगळवार, दि. ९) श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक, पूजा, बैलगाडा स्पर्धा, पालखीची मिरवणूक,भजनी भारुड व लोकनाट्य तमाशा अशा कार्यक्रमांनी साजरा झाला.धार्मिक वातावरणात तळेगावकर नागरिकांनी पाडव्या, निमित्त गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले.
तळेगाव दाभाडे शहरात घरोघरी गुढी उभारून, रांगोळ्या काढून तसेच तोरणे बांधून(Talegaon Dabhade)अतिशय उत्साहाने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा ‘वार्षिक उत्सव’ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने, मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक पूजा आणि बैलगाडे,पालखीची मिरवणूक,भजनी भारुड व लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमाने उत्सवाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.

गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन काकडे, पदाधिकारी प्रणव दाभाडे, स्मितेश भेगडे, सुधीर सरोदे यांचे हस्ते श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी व ग्रामपुरोहित अतुल रेडे यांचे मंत्रघोषाने गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गणपतीमाळ येथे बैलगाडा स्पर्धा सकाळी 8 वाजता सुरु करण्यात आल्या.बैलगाडा धावपट्टीच्या घाटाची पूजा अजिंक्य सातकर,दिनकर भेगडे व उत्सव समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.आज पहिल्या दिवशी टोकनचे 150 गाडे तर गावातील 50 गाडे स्पर्धेत सहभागी झाले होते.
सायंकाळी ग्रामदैवत श्रीडोळसनाथ महाराजांच्या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखीचे प्रस्थान झाले.यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी व मान्यवर आणि पालखीचे मानाचे खांदेकरी भोई समाजातील समाज बांधव सहभागी झाले होते.

ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी मंदिरापासून सरसेनापती दाभाडे यांच्या वाड्यावर आली.तेथे औक्षण झाल्यानंतर पुन्हा मंदिरापासून भेगडे आळी,गणपती चौक,भोईआळी,  राजेंद्र चौक,मारुती मंदिर, जिजामाता चौक,सुभाष चौक,शाळा चौक, गणपती मंदिरापासून श्रीडोळसनाथ मंदिरापर्यंत पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली.

Mumbai : महायुतीला फक्त पंतप्रधान मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे

यावेळी फटाक्याची आतषबाजी करून पालखीच्या पुढे ढोललेझीम,बँड,भजनकरी याचे नियोजन करण्यात आले होते. पालखीच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती तसेच अनेक महिला व नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.जत्रेमध्ये अनेक प्रकारची दुकाने विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी थाटली होती. तसेच अनेक प्रकारचे खेळ देखील मांडण्यात आले होते.त्याचा अबालवृद्धांनी मनसोक्त आनंद लुटला.
रात्री घोरावाडी स्टेशनाच्या मैदानावर कै.लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांचे आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे यांचा लोकनाट्य तमाशा तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर श्री राम कला पथक मंडळ पवळेवाडी यांचे रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या यात्रेनिमित्त पोलीस उपायुक्त परिमंडळ २चे बापू बांगर,सहाय्यक पोलीस उपायुक्त देहूरोडचे देविदास घेवारे यांचे मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व सहका-यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.