Akurdi : साडेबारा टक्के जमीन परतावा मिळवून दिल्याबद्दल  भूमिपुत्रांकडून खासदार बारणे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्के (Akurdi)परतावा मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील  शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासप मित्रपक्ष(Akurdi) महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी नगरसेवक शंकरराव पांढारकर, निलेश पांढारकर, कैलास कुटे, श्रीधर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप पांढारकर, ॲड.राजेंद्र काळभोर, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

 

 

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय प्रदीर्घकाळ प्रलंबित होता. खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा करत नुकताच शासन आदेश (जीआर) जारी करण्यात यश मिळवले.

त्यामुळे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. सर्वांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.