Chinchwad : गुटखा विक्री प्रकरणी दिघी आणि निगडी मध्ये पोलिसांची कारवाई

एक लाख 33 हजार 201 रुपये किमतीचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – दिघी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री प्रकरणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एक लाख 33 हजार 201 रुपये किमतीचा गुटखा (Chinchwad) जप्त करण्यात आला आहे.निगडी पोलीस ठाण्यात विशाल शहाजी जगताप (वय 21, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची सविस्तर मीहिती अशी की,  आरोपी  विशाल शहाजी जगताप (वय 21, रा. आकुर्डी) हा गंगानगर येथील पांढरकर उद्यानाच्या बाहेर असलेल्या टपरीमध्ये गुटखा अवैधरित्या विकत होता. निगडी पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी सोमवारी (दि. 8) कारवाई करून 65 हजार 326 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

Dighi : वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली बुद्रुक येथे खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून 67 हजार 875 रुपये किमतीचा (Chinchwad) गुटखा जप्त केला. याप्रकरणी सत्यसिंग कमलेशसिंग परिहार (वय 24, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि आशिष अशोक जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. दिघी पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.