Talegaon : हुंदाई कंपनीतून माल चोरून नेणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Talegaon) नवलाख उंब्रे येथील हुंदाई कंपनीमधून 14 हजारांचा माल चोरून नेताना दोघांना पकडण्यात आले. ही घटना 1 ते 27 मार्च या कालावधीत घडली.

दिलीप जयदत्त हुंबे (वय 38, रा. सांगवडे, ता. मावळ), नानासाहेब बापू लांबरूड (वय 29, रा. शेटेवस्ती, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी धनंजय दशरथ मोरे (वय 31, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

YCMH : वायसीएममध्ये मेस्कोच्या 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी (Talegaon) त्यांच्या ताब्यातील ट्रक मधून आठ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर आणि सहा हजार रुपये किमतीची कॉपर वायर असा 14 हजारांचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.