YCMH : वायसीएममध्ये मेस्कोच्या 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (YCMH) संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तसेच अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू वॉर्ड) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) 17 सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.

‘वायसीएम’ रुग्णालयात अकरा मजली इमारत तयार झाली आहे. इमारतीच्या आठव्या, नवव्या व दहाव्या मजल्यावर पदव्युत्तर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह असणार आहे. तसेच रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड क्रमांक 1, 2 व 3 येथील रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी कमी करण्यासाठी तीन पाळीमध्ये अतिरिक्त सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्याचे (YCMH) रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.

Pune : कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी महिला कलाकारांनी जरूर संपर्क करावा – मेधा कुलकर्णी

त्यानुसार, सुरक्षा विभागाने मेस्कोचे 17 अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची आंतररुग्ण विभागात नियुक्ती केली आहे. ही नेमणूक 2 वर्षांसाठी आहे. एका सुरक्षारक्षकास दरमहा 31 हजार 451 रूपये वेतन आहे. त्यानुसार 17 सुरक्षारक्षकांचे एका महिन्याचे वेतन 5 लाख 34 हजार 667 रूपये होते. दोन वर्षांसाठी 1 कोटी 28 लाख 32 हजार रूपये खर्च आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.