Pune : कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी महिला कलाकारांनी जरूर संपर्क करावा – मेधा कुलकर्णी

एमपीसी न्यूज – निवेदिता प्रतिष्ठानचं 25 वे वर्ष आहे (Pune) आणि प्रतिष्ठाना तर्फे वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या महिलांना घेऊन काम करण्याचा त्यांचा हा मानस खूप छान आहे. विविध कलाक्षेत्रातील महिला एकाच व्यासपीठावर आणणं आणि एवढ्या महिलांना इतके वर्षे एकत्रित ठेवणं हा अनुराधा ताईंचा उपक्रम खूप छान आहे. अशा कलाकारांच्या पाठीशी मी नेहमीच असते. मी स्वतः राजकारणात काम करणारी स्त्री असली तरीही मी स्वतः एक रसिक आहे. कलाकारांची दाद मी नेहमीच देत असते आणि यापुढे कोणत्याही कलाकार महिलांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्या माझ्याशी संपर्क करू शकतात. मी कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

निवेदिता प्रतिष्ठान तर्फे आयोजित ५ दिवसांच्या ललना कला महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (अकलूज) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पं. डॉ. नंदकिशोर कपोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-आप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, वर्ल्ड क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या नीता मेहता आणि इंटरनॅशनल पॉवरलिफ्टर ज्योती भाडेकर आणि रजनी अंतापुरकर याप्रसंगी विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.हा कार्यक्रम (Pune) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, पद्मावती येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरवात झाली निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा भारती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की निवेदिता प्रतिष्ठानचे यंदाचे रौप्य महोत्सवी 25 वे वर्ष असून. ललना कला महोत्सवाचे यंदाचे ११ वे वर्ष आहे नृत्य, गायन, वादन, चित्रकला, नृत्यकला, क्रीडा या क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ आहे.

याप्रसंगी ‘ललना कलारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये ‘स्टार प्रवाह’फेम बालगायिका श्रुती भांडे (वय 9 अकोला), भरतनाट्यम् नृत्यांगना मिताली नाईक (गोवा), कथ्थक नृत्यांगना डॉ. नीलिमा हिरवे (पुणे), ‘इन लाइन फ्री स्टाइल स्केटिंग’मध्ये आशियाई चॅम्पियशिप पटकाविणाऱ्या श्रेयसी जोशी (वय 15, पुणे) व स्वराली जोशी (वय १७, पुणे) आणि प्रख्यात चित्रकार रुही अन्वर कुरेशी यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.

याप्रसंगी उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले त्यामध्ये नृत्य, काव्य व चित्रकला या माध्यमातून सादर होणारा ‘पंचतत्त्व आणि स्त्री’ कार्यक्रम ‘आकृती’ग्रुप तर्फे सादर झाला. नाट्यछटा व कथा या माध्यमातून भारतातील शूर व धाडसी महिलांवर आधारित ‘ऐतिहासिक वीरांगना’ कार्यक्रम ‘कथासाखी’ ग्रुप तर्फे सादर झाला. भरतनाट्यम् नृत्याद्वारे ‘महिषासुरमर्दिनी व भैरवी शतकम्’ हा कार्यक्रम राम वाळिंबे व मुक्ताताई भागवत यांनी सादर केला, कथ्थक नृत्याद्वारे ‘नवदुर्गा’ हा कार्यक्रम ‘कलापद्म अकॅडमीच्या’ कलावंतानी सादर केला आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाण्यांवर आधारित ‘रंगीला रे’ हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम ‘निवेदिता प्रतिष्ठान’ व ‘नृत्यांजली कथक ग्रुप’ यांनी सादर झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अनुराधा भारती व श्रुती दातार यांनी केले. आभार प्रदर्शन सीमाताई येवलेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.