Pune : गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य कार्यकर्ता ते (Pune) खासदार असा राजकीय प्रवास करणारे, पुण्याच्या राजकीय संस्कृतीतील अभ्यासू, अजातशत्रू व्यक्तिमत्व, लोकनेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन कार्यकर्त्यांनी केले.

पुण्यनगरीचे लोकनेते, संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व, स्फूर्तीस्थान  गिरीश  बापट यांच्या प्रतिमेस प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुष्पहार अर्पण करून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अभिवादन केले. स्व. गिरीशभाऊंच्या निवासस्थानी हे अभिवादन केले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.

Mahalunge : कंपनीतून तेल आणि एनर्जी ड्रिंक चोरताना दोघांना अटक

सोशल मीडियावर बापट यांच्या आठवणींना उजाळा देण्यात (Pune) आला. कार्यकर्त्यांनी जुने फोटो पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, एकेकाळी बापट यांनी पुण्याचे नेतृत्व केले. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बापट यांनी शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.