Mahalunge : कंपनीतून तेल आणि एनर्जी ड्रिंक चोरताना दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीमधून दोघांनी रिफाइंड (Mahalunge) तेल आणि रेडबुल एनर्जी ड्रिंक चोरण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत स्टेलर व्हॅल्यू चेन सोल्युशन प्रा ली या कंपनीत महाळुंगे येथे घडली.

राहुल उदाने, प्रथमेश गावडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रमणीरंजन घनशाम साहू (वय 37, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल उदाने आणि प्रथमेश गावडे हे फिर्यादी साहू काम करत असलेल्या स्टेलर व्हॅल्यू चेन सोल्युशन प्रा ली या कंपनीत काम करतात. राहुल आणि प्रथमेश यांनी रिफाइंड तेलाचे 26 पाकीट आणि (Mahalunge) रेडबुल एनर्जी ड्रिंकचे 24 कॅन चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.