Moshi : गुंतवणुकीच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – स्कायरीम कॅपिटल (Moshi) या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास 300 टक्के जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका तरुणाची 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

अग्नेश, अन्य रेड्डी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), स्कायरीम कॅपिटल कंपनीचे प्रतिनिधी भासवणाऱ्या व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हतेशभाई घनशामभाई चौहान (वय 28, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

YCMH : वायसीएममध्ये मेस्कोच्या 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी चौहान यांना व्हाटस अप ग्रुपमध्ये घेऊन त्यांना स्कायरीम कॅपिटल या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास 300 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यासाठी (Moshi) चौहान यांनी 25 लाख 55 हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी चौहान यांना 50 हजार रुपये दिले. उर्वरित पैसे आणि त्यावरील परतावा असे एकूण 35 लाख 5 हजार रुपये न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.