Moshi : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने मजुराचा खून

एमपीसी न्यूज – उसने घेतलेले पैसे हजार रुपये परत केले नाहीत म्हणून ( Moshi ) लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून देत मजुराचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) शिवाजीवाडी, मोशी येथील एका बांधकाम साईटवर घडली.

सत्यनारायण कर्ष (रा. लेबर कॅम्प, मोशी) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी गजानंद किरीसिंग कर्ष (वय 39, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेंद्रकुमार व्यासनारायण कर्ष (वय 32 रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Nigdi : नेहा हिरेमठ हत्येच्या निषेधार्थ निगडीत निदर्शने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण कर्ष, रुपेश साहू, गोलू साहू, प्रदिपकुमार कर्ष हे मोशी येथील श्री साई फॉर्च्यूंन सोसायटी येथे पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टजवळ प्लास्टरचे काम करत होते.

यावेळी आरोपी तेथे आला व त्याने उसने दिलेले एक हजार रुपये सत्यनारायण यांच्याकडे परत मागितले. यावेळी पैसे नाहीत असे सत्यनारायण म्हणाले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जोरजोरात धक्के देत लिफ्टच्या 40 फूट खोट डक्टमध्ये ढकलून दिले. ज्यात सत्यनारायण यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Moshi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.