Dehuroad Crime : नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे; 37 वर्षीय नराधमाला अटक

एमपीसी न्यूज – नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका 37 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता देहूरोड परिसरात घडली.

अरुण शंकर सहारे (वय 37, रा. किवळे) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या 35 वर्षीय आईने शनिवारी (दि. 31) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने त्याच्या घरात ओढत नेले. घरात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग आणि लैंगिक शोषण केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.