Bhosari : गौतमी पाटीलचा कार्यक्रम परवानगी शिवाय घेतल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – राज्यातील तरुणाईला भुरळ पाडलेल्या प्रसिद्ध (Bhosari ) नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम भोसरी येथे आयोजित करण्यात आला. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या कारणास्तव भोसरी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली असताना आयोजकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बर्थ डे बॉय अमित शंकर लांडे आणि आयोजक मयूर रानवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि. 21) युवा नेते अमित लांडे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान आयोजकांनी भोसरी पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली.

NIA News : दहशतवादी बलबीरवर दहा लाखाचे इनाम

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या कारणास्तव भोसरी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तसेच आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, असेही सुचवले. मात्र आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली नाही.

परवानगी शिवाय सोमवारी दणक्यात गौतमी पाटील चा कार्यक्रम संपन्न झाला. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असे समीकरण राज्यभर सुरू असताना भोसरीत मात्र हा कार्यक्रम हुल्लडबाजी शिवाय संपन्न झाला. तरीही परवानगी नाकारलेली असतानाही कार्यक्रम घेतल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला (Bhosari ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.