Bhosari : विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरी जाऊन विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकबर मुनीर शेख (वय 47, रा. बालाजीनगर, झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) आणि शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका 14 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घरी असताना अकबर आणि शुभम हे दोघेजण दरवाजात आले. त्यावेळी पीडित मुलीने त्यांना काय काम आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी दोन्ही आरोपींनी तिचा विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अकबर याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.