Bhosari : महिलेचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी

एमपीसी न्यूज – महिलेचे प्रायव्हेट फोटो सोशलमिडीयावर व्हायरल (Bhosari ) करण्याची धमकी देत महिलेकडून पैशांची मागणी करणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 मे रोजी कासारवाडी येथे घडला.

याप्रकरणी महिलेने  भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन ठाकर (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : पालखी सोहळा मार्गावर शंभर मीटरपर्यंत नो पार्किग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने महिलेचे  व्हाॅट्स अ‍ॅप अकाऊंट हॅक करून फिर्यादीच्या मोबाईलमधील प्रायव्हेट फोटो, , इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल करण्याची धमकी दिली. ते  डिलीट करण्यासाठी त्याने फिर्यादीकडून  23 हजार 500 रुपये घेतले. तसेच पुढे 1 लाख रुपयांची मागणी केली. यावरून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भोसरी पोलीस पुढील तपास करत (Bhosari ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.