Pune : पालखी सोहळा मार्गावर शंभर मीटरपर्यंत नो पार्किग

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Pune) यांच्या पालख्या शहरात एकत्र आल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक सोमवारी (ता. 12 ) दुपारी 12 वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावरील दोन्ही बाजूस शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अरुणा चौक ते पारशी अग्यारी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

 Pune : कामगार कायद्यातील तरतूदी चा भंग करणाऱ्या महावितरण कंपनी व कंत्राटदारावर कारवाईचे आदेश

 

पालख्यांसह दिंड्यासोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग  –

सोमवारी (दि.12) आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी- मरकळ – तुळापूर – फुलगाव – लोणीकंद – वाघोली- लोहगाव- येरवडा या मार्गाचा वापर करावा. इंदिरानगर, दत्त मंदिर पासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर (Pune) करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.