Bhosari : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज –  महिलेच्या व्हॉटसअपवर ( Bhosari) अश्लील मॅसेज सेंड करत तसेच तिचा पाठलाग करत विनयभंग करणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक  केली आहे. हा प्रकार 23 मे ते 22 जून या कालावधीत भोसरी येथे घडला.

महिलेनेने गुरुवारी (दि.22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिपक भरत हिरडे (वय 30 रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे.

Balewadi : शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधांचा अद्ययावत आराखडा बनवा; क्रीडा मंत्र्यांच्या सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉटसअपवर आरोपीने अश्लील मॅसेज पाठवले. पुढे त्यांचा पाठलाग करत त्रास देण्यास सुरुवात केली.

तसेच भेटायला बोलावून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली ( Bhosari)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.