Alandi : कोयत्याचा धाक दाखवून फळ विक्रेत्याला हप्ता मागणाऱ्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – फळ विक्रेत्याला महिन्याला 200 रुपये हप्त्याची (Alandi) मागणी करत कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या चौघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 19 जून रोजी सायंकाळी देहुफाटा चौक आळंदी येथे घडला आहे.

Bhosari : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

याप्रकरणी गुरुवारी (दि.23) सोहम पद्मराज काळे (वय 23 रा.आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शामा विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस सर्व राहणार आळंदी, पद्मावती झोप़डपट्टी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व आरोपी यांच्यात तोंडओळख आहे.  फिर्यादी त्यांच्या फळाच्या दुकानावर असताना आरोपी तेथे आले त्यांनी कोत्याचा धाक दाखवत ज्ञानेश्वर बडगे हा आळंदीचा बाप आहे.

इथे धंदा करायचा असेल तर महिन्याला 200 रुपये हप्ता दे नाही तर तुझे दुकान तोडून टाकीन अशी धमकी दिली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Alandi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.