Moshi : कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू, कंटेनर चालकाला अटक

एमपीसी न्यूज – कंटेनर ची दुचाकीला धडक (Moshi )बसली. यात दुचाकीवरील महिला खाली पडली असता तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. यात तिचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.22) मोहननगर येथे मोशी –पुणे रोडवर सकाळी घडला.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनगर गाडीवरील चालक व्यकट दिगंबर दिवटेवाड (वय33 रा. चिखली) याला अटक केली असून सुभाष गुलाब पावर (वय 35 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

Alandi : कोयत्याचा धाक दाखवून फळ विक्रेत्याला हप्ता मागणाऱ्या चौघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात होते. यावेळी एमएच14 ईएम 7878 वरील कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात फिर्यादी यांच्या मागे बसलेली  त्यांची पत्नी खाली प़डली.

यावेळी त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले ज्यांत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी यांनाही डोक्याला, पाठीला व पायाला दुखापत झाली आहे व गाडीचे पुर्ण नुकसान झाले आहे.

याप्रकरणी एमय़आडीसी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत (Moshi ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.