Bhosari : एमआयडीसी भोसरी मधील कंपनीतून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीच्या (Bhosari) स्टोअर रुममधून तब्ब्ल पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. ही चोरी शुक्रवारी (दि.16) रात्री मरक्युरस वॉटर ट्रीटमेंट प्रा.लि. या कंपनीच्या प्रोडक्शन व स्टोअररुममध्ये झाली आहे.

Maharashtra news : अमली पदार्थांचा व्यापार आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष

याप्रकरणी मंगळवारी (दि.18) अवधुत पांडुरंग खोत (वय 38 रा.लोहगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराने कंपनीच्या बाथरुमच्या भिंतीवरून उडी मारून कंपनीत प्रवेश केला.

त्याने कंपनीतीली प्रोडक्शन व स्टेअर रुममधील 1 लाख 74 हजार रुपये किंमतीचे एसएस पाईप व फ्लेक्झीबल केबल चोरून नेले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत (Bhosari) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.