Pimpri : माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने क्रिडा, कला, विकास प्रकल्पास क्रिडा साहित्य भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रिडा कला विकास प्रकल्पाच्या खेळाडू दत्तक योजने (Pimpri )अंतर्गत महापालिका संघातील थेरगाव माध्यमिक विद्यालयातील  आजी-माजी विद्यार्थीनीच्या कबड्डी संघास माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने ट्रॅकसूट व कबड्डी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

Bhosari : एमआयडीसी भोसरी मधील कंपनीतून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

सतेज कबड्डी संघ बाणेर आयोजित  18 ते 23 जुलै  यादरम्यान “सतेज करंडक” या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी क्रिडा, कला, विकास प्रकल्पच्या विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.

यामध्ये कोमल राठोड, निकिता  माळी, रुपाली डोंगरे, भूमिका गोरे, पूजा तेलंग, विद्या गायकवाड, सिफा वस्ताद, सविता गवई, मनिषा राठोड, रेखा राठोड, किर्ती कडचंगी, प्रतिक्षा लांडगे या  महिला खेळाडू व दोन पर्यवेक्षक यांना कबड्डी साहित्य व ट्रॅकसूट भेट  देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडे न बनता क्रिडा संगीत अभिनयाची आवड जोपासत केवळ राज्यातच नव्हे तर देश पातळीवर आपले न आपल्या शहराचे नाव उज्वल करावे असे मनोगत वाघेरे यांनी विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, क्रिडा पर्यवेक्षक बन्सी आटवे, हर्षदा राउत, सुनिता ताम्हाणे, ऋषिकेश  वचकल आदी उपस्थित (Pimpri )होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.