Talegaon Dabhade : विद्यालयीन क्रीडा स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व साहेबराव काकडे महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन खोखो मुली स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 19 संघांनी सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयाची प्रियंका इंगळे, रुतिका राठोड साक्षी शेंडगे, सोनी साहू यांनी अष्टपैलू खेळ केला आणि संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले. सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाने अंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत पद मिळविले.

PMPML: पीएमपी मालामाल, एका दिवसात दोन कोटींची कमाई

संघातील प्रियांका इंगळे व रुतिका राठोड या दोघींची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा डॉ. हरीसिंग कौर विश्वविद्यालय, सागर मध्यप्रदेश येथे होणार आहे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुरेश थरकुडे यांचे खो-खो संघास मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व अमृतेश्वर महाविद्यालय विंजर तालुका वेल्हा, आयोजित अंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या रुचिका ढोरे, प्रणोती नांबरे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रतीक्षा कडू हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर मुलांच्या गटात ओमकार पापळ याने प्रथम क्रमांक तर अक्षय म्हाळसकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व खेळाडूंची राजगुरुनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

खेळाडूंच्या खो-खो व वेटलिफ्टिंग स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरीबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे,सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.