Chandani Chowk : चांदणी चौकातील पूल पाडल्याने 80 टक्के वाहतूक कोंडी कमी

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर (Chandani Chowk) दोन लेन वाढल्याने 80 टक्के वाहतूक कोंडी कमी झाल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे विभागीय पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. भोईटे पुढे म्हणाले, की ”पुढच्या आठवड्यात आणखी एक लेन वाहतूकीसाठी खुली करण्यात येईल. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होईल.

याबाबत अधिक माहिती देताना, बावधन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले, की ”पूर्वी चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे चौकामध्ये वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे येथील उड्डाणपूल काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला. तसेच बाजूच्या डोंगराचा खडक फोडून रस्ता तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे साताराकडे जाणाऱ्या वाहनासाठी दोन नवीन लेन तयार झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.
राजमाने पुढे म्हणाले, की ”पूल पाडण्यापूर्वी चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत जड वाहने ऊर्से व वाकड येथे थांबवण्यात येत होती. तसेच, चांदणी चौकामध्ये बावधन व पौडकडून येणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात येत होती. आता पूल पाडल्यानंतर दोन नवीन लेन साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उपलबध झाल्याने जड वाहने ऊर्से व वाकड येथे थांबविण्यात येत नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.