Chakan : 196 गुंठे जमीन परस्पर विकत व्यावसायीकाची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत 196 गुंठे जमीन परस्पर विकत ( Chakan ) व्यावसायीकाची अडीच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 24 सप्टेंबर 2004 ते 15 जुलै 2022 या कालावधीत कुरुळी येथे घडला आहे.

याप्रकरणी राजेश शंकरलाल काकाणी (वय 51 रा.वाशी, नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) फिर्याद दिली असून शंभू धोंडिराम पवार ( रा.भोसरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan : धावत्या शिवशाही बसला आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीत याला फोर्ट सिटी डेव्हलपर्सतर्फे घेण्याच आलेल्या गट क्रमांक 679 कुरुळी, खेड येथील 73.225 एकर जमिनीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरीता दिलेल्या कुलमुखत्यार पत्राचा गैर वापर करत फिर्यादी यांच्या परस्पर 110 गुंठे जमीन सात लोकांना विकली, तर 86 गुंठे जमीन  ही  दोन लोकांना विकली.

अशा प्रकारे परस्पर 2.59 कोटींची 196.9 गुंठे जमीन विकली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. चाकण पोलीस याचा पुढील तपास करत ( Chakan ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.