Pune : शिवसेनेचे पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत (Pune) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संबधीत आरोपीवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.त्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देखील देण्यात आले.

Chakan : 196 गुंठे जमीन परस्पर विकत व्यावसायीकाची अडीच कोटींची फसवणूक

यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, मागील अकरा महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात विकास कामांचा धडका लावला आहे.पण त्याच दरम्यान सोशल मीडियावर एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे.

त्या व्यक्ती विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करीत आहे.या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घ्यावे ,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

 तसेच ते पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा समाजात चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहे.हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही.लवकरात लवकर या गोष्टी थांबल्या नाही.तर आम्ही जशाच तस उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना  (Pune)  दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.