Dehuroad : नियमांचे पालन न करता तब्बल 14 लाख रुपयांचे मेंटेनन्स घेतल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : सोसायटीच्या ओनरशिप ऑफ अॅक्ट अंतर्गत नियमांची (Dehuroad) पुर्तता न करता 14 फ्लॅट धारकांची मेंटेनन्सच्या नावाखाली 14 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2015 ते आजपर्यंत घडली आहे.

याप्रकरणी सुभाष हरी तेलंग (वय 39 रा.देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) फिर्याद दिली असून पंडित नानाभाऊ मोळक (वय 54 रा.चऱ्होली) व दत्तात्रय विठ्ठल पोतले यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : शिवसेनेचे पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर 14 जणांना आरोपीने फ्लॅटची विक्री केली. मात्र महा ओनरशीप ऑफ फ्लॅटस अॅक्ट अंतर्गत नियमांची पुर्तता न करता नियमांचे उल्लंघन करत बिल्डींग मेंटेनन्सच्या (Dehuroad) नावाखाली प्रत्येकी 1 लाख असे एकूण 14 लाख रुपये घेत फसणूक करण्यात आली आहे. यावरून विकासका विरोधात गुन्हा दाखल केला असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.