Chakan : सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- सार्वजनिक ठिकाणी महिलेची गैरवर्तन करत तिला (Chakan) मारहाण करणाऱ्या माथेफिरूला चाकण पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार चाकण येथील माणिक चौक येथे बुधवारी (दि.11) घडला.

 

चाकण पोलिसांनी या प्रकरणात बाबू उर्फ कुमार जालिंदर ईनकर (वय 25 रा चाकण) याला अटक केली असून पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

RTI Act : माहिती अधिकार कायद्याला 18 वर्ष पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या चौकात एका मोबाईलशॉपीसमोर त्यांच्या पतीसोबत थांबले होते. यावेळी आरोपी त्यांना वाईट नजरेने पाहत होता,फिर्यादी या थोड्या बाजूला गेल्या असता आरोपी जवळ आला व त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने थेट त्यांच्या कानाखाली मारली.

 

यावेळी पतीनेही याबाबत जाब विचारला असता आरोपीने फिर्यादीच्या पतीलाही हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.