Pimpri : टेम्पो चालकाला अडवून मारहाण करत लुटणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- बुलेट वरून येऊन एका टेम्पोला अडवत चालकाला मारहाण (Pimpri) करण्यात आली.  तसेच त्याच्याकडील पैसे व मोबाईल देखील घेण्यात आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना पिंपरीतील वल्लभनगर परिसरात बुधवारी (दि.11) मध्यरात्री घडली.

याप्रकरणी शुभम चिंतामणी कांबळे (वय 24 रा कासारवाडी) याला अटक केली असून पिंपरी पोलीस ठाण्यात आरिफ शब्बीर भांगिरे( वय 28 रा सोलापूर)  यांनी फिर्याद दिली आहे.

 

Chakan : सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो घेऊन जात असताना आरोपी बुलेट वरून आले व त्यांनी फिर्यादीला अडवले. यावेळी दुचाकीला धक्का दिला या कारणावरून फिर्यादीशी वाद घालत टेम्पोची चावी काढून घेण्यात आली.

तसेच मारहाण करत व चाकूचा  धाक दाखवत फिर्यादी यांच्याकडून रोख चार हजार रुपये व पंधरा हजार रुपयांचा फोन असा ऐकून 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून घेण्यात आला. यावेळी  आरोपी पळून गेले. पिंपरी पोलिसांनी तपास करत एकाला (Pimpri) अटक केली असून पोलीस आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.