Chakan : चाकणमध्ये ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ साजरा ; ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचे… वर्तमानपत्राचे गठ्ठे ( Chakan ) ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा 15 ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा केला जातो. चाकण ( ता. खेड ) येथे अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला.

चाकण परीसरात सध्या मोजकेच वृत्तपत्र विक्रेते आहेत. इमानेइतबारे व्यवसाय करणारा हा घटक तसा उपेक्षित राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मागील 20 ते 40 वर्षांपासून चाकण मधील काहीजण वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत.

चाकण मध्ये नंदकुमार कर्नावट हे गेली 40 वर्षांपासून वर्तमानपत्र वितरीत करत आहेत.  या शिवाय अनिल मेदनकर, हबीब पठाण असे काही प्रमुख वृत्तपत्र विक्रेते चाकणमध्ये मागील 20 ते 25 वर्षांपासून कार्यरत आहेत.

Pune : महाराष्ट्रातल्या मुली आणि स्त्रिया सुरक्षित रहाव्यात; नीलम गोऱ्हेंचे तांबडी जोगेश्वरी देवीला साकडे

चाकण मधील वृत्तपत्र विक्रीचे स्टाॅल आणि चाकण मार्केटमध्ये प्रातिनिधिक स्वरुपात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, राम गोरे, जमीर काझी, ॲड. निलेश कड पा. , बाळासाहेब गायकवाड, समीर सिकीलकर, भरत गोरे, प्रकाश गोरे, भास्कर तुळवे, बाळासाहेब सातपुते, पत्रकार अविनाश दुधवडे आदी उपस्थित होते.

 

वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती हा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांना समाजात अधिकाधिक सन्मान लाभावा अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त ( Chakan ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.