Pune : महाराष्ट्रातल्या मुली आणि स्त्रिया सुरक्षित रहाव्यात; नीलम गोऱ्हेंचे तांबडी जोगेश्वरी देवीला साकडे

एमपीसी न्यूज – पुण्याची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी देवीची घटस्थापना (Pune) आज करण्यात आली. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली .

Pune : पुणे रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेसमधून 90 किलो गांजा जप्त

देवीची आरती करत नीलम गोऱ्हे यांनी  विधीवत पूजा केली. तसेच  देवीला साडी चोळीची  ओटी देखील अर्पण केली.

पत्रकारांनी देवीकडे काय मागितले असे विचारले असता नीलम गोऱ्हेंनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या मुली आणि स्त्रिया सुरक्षित रहाव्यात असे देवीकडे साकडे  घातले आहे. तसेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या (Pune) नेतृत्वात राज्य सुजलाम सुफलाम व्हावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना केली  आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.