Chakan : पोलीस अंमलदार योगेश ढवळे अपघात प्रकरणातील आरोपी स्वतः पोलिसात हजर

एमपीसी न्यूज – चाकण वाहतूक विभागातील (Chakan) पोलीस अंमलदार योगेश गणपत ढवळे (वय 40) हे सकाळी दहा वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पंचप्राण शपथ घेण्यासाठी जात असताना त्यांना एका डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 9) एच पी पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेतील आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

भाऊसाहेब जनार्दन जाधव (वय 42, रा. भोसे, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे.

योगेश ढवळे हे चाकण वाहतूक विभागात कार्यरत होते. बुधवारी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चाकण मधील माणिक चौकात त्यांना ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर हजर होऊन ते सकाळी दहा वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्यासाठी त्यांच्या दुचाकी (एमएच 14/जेएल9936) वरून जात होते.

Bavdhan : भांडण करण्याचा जाब विचारल्याने तिघांना मारहाण करत लुटले

चाकण मधील एच पी पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर ढवळे यांच्या दुचाकीला एका डंपरने (एमएच 14/जेएल 9939) धडक दिली. ढवळे यांनी हेल्मेट घातलेले होते. डंपरची धडक बसल्यानंतर ते रस्त्यावर पडले आणि डंपरच्या मागील चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी जाधव हा त्याच्या ताब्यातील डंपर घेऊन चाकण-तळेगाव चौकातून मोशीच्या दिशेने जात होता. दरम्यान, ही घटना घातली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी जाधव याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे तपास करीत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.