Charholi : श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे सरकार यांच्या तैलचित्राचे अनावरण

एमपीसी न्यूज – चऱ्होली गावचे (Charholi) जनक श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे सरकार यांच्या तैलचित्राचे माजी महापौर नितीन काळजे, कोषाध्यक्ष सचिन तापकीर, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांच्या हस्ते दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अनावरण करण्यात आले. हा सोहळा चऱ्होली येथे संपन्न झाला.

यावेळी संतोष पठारे, विजेंद्र दाभाडे, सचिन गिलबिले, दगडू गोपाळ दाभाडे, मधुकर दाभाडे, बाबासाहेब दाभाडे, कुंडलिक दाभाडे, समीर दाभाडे, सुरज दाभाडे, सिद्धेश्वर दाभाडे, अजय दाभाडे आदी उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मराठा घराण्यांनी बलिदान दिले. यात चऱ्होली गावचे सरदार दाभाडे घराण्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सरदार कृष्णाजी दाभाडे यांनी मोगलांविरुद्ध लढा दिला. गुजरात, खानदेश, मिरज, बारामती, कोकण, दिल्ली येथे झालेल्या लढायांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन शाहू छत्रपती यांनी सुभेदार व सेना बारासहश्री ही (Charholi) प्रमुख पदे त्यांना दिली.

Chinchwad : बहिरवाडे प्रतिष्ठानतर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप

हे तैलचित्र सागर दाभाडे यांच्या प्रयत्नातून तयार झाले आहे. तसेच विश्वशील साठे दाभाडे सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार विकास महाले यांनी तैलचित्र बनवले आहे. या तैलचित्राचे चऱ्होली ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.