Charholi : एक लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  विक्रीसाठी 1 लाख रुपयांचा गांजा घेऊन आलेल्या तरुणाला पोलिसांनी गांजसह अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या  खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी (दि.16) चऱ्होली येथील पठारे मळाजवळ (Charholi) केली आहे.

 

विकी उर्फ विकास आकाश घोडके (वय 29 रा.पुणे स्टेशन) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार अजय ससाणे (रा.श्रीगोंदा अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दिघी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार विजय नलगे यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी हा 1 लाख 650 रुपयांचा 2 हजार 13 ग्रॅम वजनाचा गांजा घेवून (Charholi) आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. त्याच्याकडून पोलिसांनी गांजा, मोबाईल, दुचाकी जप्त केली. पोलिसांनी आरोपी विरोधात एन.डीपी.एस.अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.