Talegaon Dabhade : लक्ष्मीबाई शेळके यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई बाजीराव शेळके (वय 98) यांचे बुधवारी (दि. 17)  वृद्धापकाळाने निधन (Talegaon Dabhade) झाले. त्या शेतकरी, सांप्रदायिक कुटुंबातील तसेच शेळके कुटूंबाच्या मार्गदर्शक होत्या.

 

त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्योजक शंकरराव बाजीराव शेळके, मा. नगरसेवक भिमाजी शेळके, मधुकर शेळके, कांताबाई कामठे व इंदूबाई दाभाडे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत गुरुवारी (दि.18) सकाळी 9:30 वा. अंत्यसंस्कार (Talegaon Dabhade) करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.