Chikhali : कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज – कुदळवाडी येथील विसावा चौकात असलेल्या प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. ही घटना आज (बुधवारी) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीचच्या सुमारास विसावा चौकात असलेल्या प्लास्टिक गोदामाला आग लागली. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरत गेल्याने गोदामा शेजारी असलेली 15 ते 17 दुकाने जळून खाक झाली. सकाळी आठ वाजता देखील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी या गोदामाच्या शेजारी राहणाऱ्या सुमारे शंभर रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.