Chakan : मुलगा झाला नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मुलगा झाला नाही तसेच लग्नात खर्च कमी केला या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार फेब्रुवारी 2013 ते जून 2019 या कालावधीत आंबेठाण रोड चाकण येथे घडला.

रविकांत कुमार गोरे (वय 32), कुमार गोरे (वय 65), मंगल गोरे (वय 60), सुषमा गोरे (वय 34, सर्व रा. आंबेठाण रोड, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि रविकांत यांचा 2013 साली विवाह झाला. विवाहामध्ये पीडित महिलेच्या आई-वडिलांनी खर्च कमी केला. तसेच विवाहितेला मुलगा झाला नाही.

या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला वारंवार शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. सासरच्या छळाला कंटाळलेल्या महिलेने चाकण पोलिसांना धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.