Chikhali : तीन चोरट्यांनी मोबाईल हिसकावला 

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना ज्योतिबानगर, तळवडे येथे घडली.

सोमनाथ शंकर लोहगाव (वय 25, रा. स्वामी समर्थ बंगल्याजवळ, चिखली-मोशी रोड, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सोमनाथ हे दुकानातून सामान आणण्यासाठी रस्त्याने पायी चालत जात होते. रस्त्याने जात असताना ते मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बागूल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.