Pune : दत्तवाडीत एकावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पर्वती पोलीस स्टेशनच्या (Pune) हद्दीतील दत्तवाडी परिसरात पाच ते सहा जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दत्तवाडीतील 999 चौकात ही घटना घडली. पर्वती पोलीस ठाण्यात या प्रकरणी बल्ली वाघमारे, गणेश वाघमारे आणि त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर सुनील गायकवाड या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत दत्तवाडीतील 999 चौकात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादींना शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादीने शिवीगाळ का करता अशी विचारणा केली असता आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले.
यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहे. तसेच फिर्यादींच्या मदतीला कोणी आले तर त्याला पण खल्लास करून टाकीन असे बोलून आरोपींनी त्या परिसरात दहशत निर्माण केली. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.