Yerawada : फुकटात सिगारेट न दिल्याने डोक्यात बियरची बाटली फोडली

एमपीसी न्यूज – फुकटात सिगारेट (Yerawada) देण्यास नकार दिल्याने दोघांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैनिक वाडी वडगाव शेरी परिसरात सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी रोशन कुमार संतलाल कोरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे त्यांच्या पान टपरीवर बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या दोन अनोळखी इसमानी फिर्यादी यांच्याकडे फुकट सिगरेट मागितली. मात्र फिर्यादीने फुकट सिगरेट देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली.

आरोपींनी फिर्यादीला दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादींच्या टपरीच्या बाजूला असणाऱ्या टेलर दुकानदार, पाणीपुरीवाला आणि नारळवाला यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली.  पोलीस अधिक तपास करत (Yerawada) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.