Pune : स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचे तरुणीसोबत अश्लील कृत्य

एमपीसी न्यूज – डिलिव्हरी बॉय ने 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला आणि त्याने फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली. वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉय विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की , फिर्यादी यांनी स्विगीवरून घरगुती सामान मागवले होते. ते सामान आल्यानंतर चेक करत असताना त्यात  पॅकिंग फोडल्याचे आढळून आले. दरम्यान त्यांनी स्विगीला मोबाईल वरून फाटलेल्या पॅकिंगचा फोटो पाठवला. त्यानंतर नवीन सामान घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने पैशाची मागणी केली असता फिर्यादी तरुणीने स्विगीशी बोलून घ्या असे त्याला सांगितले.
संबंधित डिलिव्हरी बॉयने मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या निमित्ताने घरात येऊन अश्लील हावभाव करत फिर्यादीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तुम सेक्स करोगी असे म्हणत फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न केली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.