Pune : प्रॉपर्टीच्या कारणावरून जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस ; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यात संपत्तीच्या वादाववरुन धक्कादायक प्रकार (Pune) उघडकीस आला आहे. एकाने एका महिलेची साडी चोरून कोथरूड येथे एका मांत्रिकाकडे नेऊन लिंबू, टाचण्या टोचून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर आमानुष,अनिष्ट व आघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याच्या व त्याचा समूळ उच्चाटन करण्यात अधिनियम कलमा नुसार सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी तक्रार दिली आहे. आजी कांता सुरेश चव्हाण, मामा गिरीश सुरेश चव्हाण, सावत्र आई संगीता सुपेकर, सावत्र भाऊ स्वप्निल सुपेकर, चुलत बहीण सोनल सुपेकर व देवऋषी स्वप्निल भोकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या मार्गात तात्पुर्ते बदल, हे असतील पर्यायी मार्ग

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याचे पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले होते. याचा राग मनात धरून महिलेच्या आईची साडी चोरली होती.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.