Ravet : तरुणाला मारहाण करत लुटणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण (Ravet) करत लुटणाऱ्या चौघांना रावेत पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.18) सायंकाळी रावेत येथील पंपिंग हाऊसच्या शेजारी घडली.

या प्रकरणी अक्षय दत्ता शिंदे (वय 28, रा. रावेत गावठाण) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाझीम इस्माईल कुरेशी (वय 22, रा, चिखली), गणेश जालिंदर जाधव (वय 22, रा. थेरगाव), अभिषेक विकास शिंदे (वय 22, रा. चिंचवड), स्वप्निल हनुमंत शिंदे (वय 21, रा, चिंचवड) यांना अटक केली आहे.

PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या मार्गात तात्पुर्ते बदल, हे असतील पर्यायी मार्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रावेत गावठाण येथून रावेत पंपिंग हाऊसच्या बाजूने जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला अडवून पैशाची मागणी केली, पैसे देण्यास नकार दिला, यावेळी आरोपींनी त्यांच्या (Ravet) जवळील लोखंडी  धारदार शस्त्राने फिर्यादी यांना मारून जखमी केले. तसेच त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेत शिवीगाळ केली. यावरून रावेत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.