Wakad : भांडणे सोडवली म्हणून तरुणाला मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज- भांडणे सोडविल्याचा राग मनात धरून तिघांनी एका ( Wakad ) अठ्ठावीस वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी वाकड येथील विशाल नगर परिसरात घडली.
या प्रकरणी निलेश बाळासाहेब नन्नवरे (वय 28 रा पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिरुद्ध अनिल कांबळे (वय 21 रा खडकी) , शुभम पप्पू वाघमोडे (वय 23 रा बाणेर), कुणाल अनिल काकडे (वय 21 रा औंध) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून त्यांच्या मेहुणी सोबत घरी जात होते. यावेळी आरोपींनी विशाल नगर येथे फिर्यादींना अडवले . जुनी भांडणे सोडवल्याचा राग मनात असल्याने , आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारून जखमी केले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास पोलीस करत ( Wakad ) आहेत.