Chinchwad : साडेचार वर्षात 15 खून ‘अनडिटेक्ट’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 33 जणांचा खून झाला. तर गेल्या साडेचार (Chinchwad)  वर्षांत 337 खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला. त्यात राज्याबाहेर जाऊन देखील अनेकांना अटक केली. मात्र या साडेचार वर्षात 15 खूनांचा उलगडा करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

दोन दुहेरी खून

15 ऑक्‍टोबर 2020 रोजी काळेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास छाया पांडूरंग गुंजाळ (वय 50) आणि मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) दोन महिलांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या घटनेला तीन वर्ष होत आली तरी अद्याप आरोपी सापडले नाहीत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील संशयितांची पोलिसांनी पोलीग्राफ टेस्ट देखील केली. त्यातून देखील पोलिसांच्या काही हाती लागलेले नाही.

तसेच वाल्हेकरवाडी येथे माय-लेकाचा दुसऱ्या पतीने खून केला होता. पोलिसांनी या घटनेतील आरोपी निष्पन्न केला. मात्र तो पोलिसांच्या(Chinchwad) हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. तो अद्याप फरार आहे.

‘त्या’ चिमुकल्याची ओळखही पटली नाही

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय कार्यान्वित झाल्यानंतर चारच महिन्यात 8 डिसेंबर 2018 रोजी थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तीन-चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. या गुन्ह्यातील मयत मुलाची ओळख पटली नसल्याने या खूनाचा उलगडा झालाच नाही.

आयुक्‍तालय सुरू होण्यापूर्वी ओटास्कीम, निगडी येथील चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर अवघ्या महिनाभरात कासारवाडी येथील चार वर्षीय मुलीवरही अत्याचार करून तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांची उकल झालेली नाही.

‘त्या’ महिलेच्या खुनाचेही गूढ कायम

9 जून 2019 रोजी देहूरोड बाह्यवळण मार्गावर मामुर्डी येथे एका महिलेच्या तोंडात ओढणी कोंबून डोक्यात वार करून खून करत मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकल्याचे उघडकीस आले. याही गुन्ह्याचे गूढ कायम आहे. अद्याप त्या महिलेची साधी ओळखही पटलेली नाही. अज्ञात ठिकाणी मारून तिचा मृतदेह बाह्यवळण मार्गावर टाकला असल्याचा (Chinchwad) अंदाज पोलिसांनी लावला आहे.

वर्ष            दाखल गुन्हे    उघडकीस आलेले गुन्हे          उकल न झालेले गुन्हे
2019          68                  65                                       03
2020          71                   69                                       02
2021          85                   80                                      05
2022          80                   77                                     03
2023          33                   31                                     02

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.